उरण करंज्यातील कोरोना रुग्ण अर्धशतकाच्या पुढे

 


आणखी पाच जणांना कोरोनाची बाधा
पनवेल प्रतिनिधी:- उरण तालुक्यातील करंजा या गावात एकाच व्यक्तीपासून अनेकांना कोरोना ची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. नव्याने आणखी पाच रुग्ण सापडल्याने करंजा येथील बाधितांची संख्या 54 झाली आहे. याअगोदर अनुक्रमे 27 आणि 21 रुग्ण सापडले होते. यामुळे उरण तालुका रेड झोन मध्ये गेला आहे

.43 वर्षांची महिलेचे कोविड19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर आणखी तीन पुरुषांना कोरोना विषाणूंची लागण झाली आहे. त्यांचे वय अनुक्रमे, 43, 48 आणि 55 आहे. तर एका वर्षाच्या लहान मुलालाही कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आल्याने ही बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.