कोरोनाचा कौटुंबिक संसर्ग: पनवेल मनपा हद्दीत नवे नऊ रुग्ण

 


एका महिला पोलिस कर्मचारी  व नऊ महिन्याच्या बाळाचा समावेश समावेश
आणखी आठ रुग्ण बरे होऊन घरी गेले
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका हद्दीत मंगळवारी आणखी नऊ रुग्ण आढळले. त्यामध्ये एका व्यक्तीमुळे कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांमध्ये एका महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खारघर मध्ये एका नऊ महिन्याच्या बाळाला लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आणखी आठ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नवीन पनवेल , सेक्टर – १३ . अ – टाईप येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोविड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. संबंधित रिक्षा चालक आपल्या जवळच्या नातेवाईकाला उपचाराकरीता अपोलो हॉस्पीटल , बेलापूर येथे वारंवार गेलेली आहे . हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ०९ . क्षिरसागर सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे पती मानखुर्द , मुंबई येथे कार्यरत असून ते याआधी कोविड – १९ पॉझिटिव्ह आलेले आहे . त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ३५ , अथर्व सोसायटी येथील ३० वर्षीय १ महिला कोरोना संक्रमित झाली आहे आहे . सदर महिला मानखुर्द पोलिस स्टेशन , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर – ४ , निकुंज सोसायटी येथील १ व्यक्ती दिनांक २४ एप्रिल 2020 रोजी मुंबई येथेच कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली होती . सदर व्यक्ती शताब्दी हॉस्पीटल , गोवंडी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाला होता . त्यामुळे ही व्यक्ती परस्पर उपचाराकामी मुंबई येथेच अॅडमीट होती . दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी ही व्यक्ती पुर्णपणे बरी होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या ती व्यक्ती त्यांच्या घरी आहे . तथापि , सदर व्यक्तीची माहिती शासनाकडून पनवेल महानगरपालिकेला दिनांक ११ मे २०२० रोजी प्राप्त झाली आहे . कामोठे , सेक्टर – ११ . साईकृपा कॉम्प्लेक्स येथील ५५ वर्षीय १ महिलेला संसर्ग झालेला आहे. सदर महिलेच्या पतीला याअगोदरच कोरना झाला आहे.आलेली आहे . पनवेल , सहयोग नगर , जोशी आळी येथील ४७ वर्षाय १ महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . या महिलेचा पती मुंबई येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे ते याआधी कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेले आहे . खारघर , सेक्टर – ३४ . सिमरन सफायर्स येथील नऊ महिन्याची १ मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर मुलीचे वडील मुंबई एअरपोर्ट येथे सीआयएसएफ कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहे . त्यांच्यापासूनच या मुलीला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . . खारघर , सेक्टर – १० , लविस्ता सोसायटी येथील ३२ वर्षीय महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला अपोलो हॉस्पीटल , बेलापूर येथे उपचाराकामी गेली होती . सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ३४ , मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील ३२ वर्षीय एका महिलेला कोरुना ची लागण झाली आहे . सदर महिलेच्या कुटुंबातील दोन महिला याआधी कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेल्या होत्या , त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे .

आठ रुग्ण कोविड मुक्त
मंगळवारी कामोठे वसाहतीतील 7 व तळोजातील एक रुग्ण कोविड मुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.