लॉकडाऊनमध्ये बनावट ई – पास ओपन


तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून जेरबंद
पनवेल – जालना प्रवासाचे बनवले बनावट पास
पनवेल/ प्रतिनिधी: – लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी बनावट ई पास तयार करणारी टोळी पनवेल शहर पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 15 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी अशाप्रकारे आणखी किती जणांना असे पास बनवून दिले त्याची माहिती तपास अधिकारी घेत आहेत.

कोरोना विषाणूंचे संक्रमण टाळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून लॉक डाउन सुरू आहे. दरम्यान शासनाने परराज्य आणि इतर जिल्ह्यातील अडकून पडलेल्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी ई – पासेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासनाने दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाइन माहिती तसेच आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर संबंधितांना ई- पास दिले जातात. यंत्रणेकडून पडताळणी करून प्रवासाची ऑनलाइन परवानगी दिली जाते. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत असलेल्या प्रवासी ई पासची बनावट प्रतिकृती तयार करण्यात आले. त्याचा वापर पनवेल ने जालना असा प्रवास करण्याकरीता आल्याची माहिती फिर्यादी कडून प्राप्त झाली. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नमूद आरोपीतांच्या नावे पास देण्यात आले आहेत काय ? याबाबतची खात्री केली पनवेल शहर पोलिसांनी केली .त्यांनी पास दिले नसल्याची उघड झाले . त्यानंतर याप्रकरणी मारुती विलास राठोड (२१) सिध्दी विनायक स्पर्श , सेक्टर १ , करंजाडे मुळगाव मु . पो . वाददंडा ता . मंटा , जि . जालना,जावेद अहमद शेख ,(२८) रुम नं ३०७ , सिध्दीविनायक स्पर्श , सेक्टर १ , करंजाडे मुळगाव मु . पो . कासारी , ना . धारूर , जि . बीड ,सलीम बाशालाल शेख , ( ४२) , गार्डन कोर्ट बिल्डींग , सेक्टर ३५ , खारघर असे आरोप अटक आरोपींची नावे आहेत. यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४ बनावट पास त्यांच्याकडील दोन सॅमसंग व एक टेक्नो कंपनीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तायडे , पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे , कादबाने ,अंबादास कांबळे , राऊत , पांडवा , आयरे , मोरे , अमरदिप वाघमारे , सुनिल गर्दनमारे ,घुले यांनी यांनी तपास केला. लॉकडाऊनचे काळात दिले जाणारे ई पाससाठी कोणाही खाजगी व्यक्तींना पोर्टल दिले नाही नागरीकांनी Covid19 . mhpolice . in या शासकीय लिंकवर जाऊन अधिकृत ई पास प्राप्त करुन घ्यावेत . असे आवाहन पनवेल शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.