धक्कादायक: नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला कोरोना

 


पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नेमणूक
पनवेल मनपा हद्दीत नव्याने दहा रुग्ण वाढले
पनवेल /प्रतिनिधी: – पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी नव्याने दहा रुग्ण वाढले. धक्कादायक बाब मध्ये आत्तापर्यंत सुरक्षित असलेल्या नवी मुंबई पोलिसांमध्ये कोरोना ची सुरुवात झाली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचारी कोविड 19 पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे कर्तव्यावर हा संसर्ग झालेला नाही. आपल्या नातेवाईकाच्या मेडिकलमध्ये गेल्याने तिथे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने ही बाधा झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याचबरोबर एका वकिलाला सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कोरोना बाधित रुग्ण मुळे त्यांच्या कुटुंबातील इतरांना संक्रमण होण्याची मालिका सुरूच आहे. ही साखळी खंडित करण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

खारघर . सेक्टर – २१ . ज्ञानसाधना सोसायटी येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बेस्ट डेपो . धारावी , मुंबई येथे बस कंडक्टर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – १७ , रिध्दी सिध्दी दर्शन सोसायटी येथील ३३ वर्षीय १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे पती गोवंडी येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोविड – १९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कामोठे . सेक्टर – ८ . महावीर वास्तू येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोविड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती पनवेल तालुका पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . हे पोलीस कर्मचारी मारूतीधाम सोसायटी , कामोठे येथील नातेवाईकाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये जात होती . या सोसायटीमध्ये याअगोदरच दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . त्यांच्या संपर्कात येऊनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नवीन पनवेल . सेक्टर – १५ . गुलमोहर पार्क येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोना झालेला आहे . ही व्यक्ती वकिल म्हणून कार्यरत असून उमरोली , पनवेल येथील याआधीच कोकिड – १९ पॉझिटिव्ह आलेले त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या संपर्कात येऊनच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ६ , अनंत वाटीका सोसायटी येथील ३५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे . ते नायगाव , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर – ३४ , मानसरोवर कॉम्लेक्स येथील ६१ वर्षीय महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेच्या घरातील तीन व्यक्ती याअगोदरच कोरोना बाधित आहेत. खारघर , सेक्टर – ८ . भुमी हाईट्स येथील ५६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे . सदर व्यक्तीटाटा पावर , चेंबुर येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे , कामोठे , सेक्टर – १४ . लेक व्हयुव अपार्टमेंट येथील ३३ वर्षीय १व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . खांदा कॉलनी , सेक्टर – ७ , व्हिजन सोसायटी येथील २९ वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत . के घाटकोपर येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे . खारघर , सेक्टर – १० . सेनसिटी सोसायटी येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बँक ऑफ इंडिया , शाखा माजगाव येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .