सुवर्ण क्षणांचा सुवर्ण महोत्सव सामाजिक बांधिलकीतून साजरा

 


लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी कोविड युद्धासाठी पन्नास हजारांची मदत
म्हात्रे दांपत्याने समाजासमोर ठेवला वस्तुपाठ
पनवेल /प्रतिनिधी:- एकमेकांची साथ देण्याचा आणाभाका उर्मिला व कमलाकर म्हात्रे यांनी 50 वर्षांपूर्वी घातला. त्यावेळी जे सात फेरे घातले त्या वर्षांनी तब्बल अर्धशतक पूर्ण केले. सप्तपदीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षांचा सुवर्णक्षण सामाजिक बांधिलकी जपत या दाम्पत्याने साजरा केला. त्यांनी सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या वैश्विक संकटाला हरवून लावण्यासाठी पनवेल महानगरपालिका च्या महापौर सहाय्यता निधी 50 हजार रुपयांचा धनादेश उपायुक्त जमीर लेंगरे कर यांच्याकडे सुपूर्द केला. व इतरांसमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला.
सध्या कोरोना ने थैमान घातले आहे. दररोज रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढलेली आहे. पनवेल परिसरातील कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी पनवेल महानगरपालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. कोविड योद्धे आपल्या प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. या संकटाला पळवून लावण्याचा दृष्टिकोनातून एकत्रितरीत्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आपलाही वाटा असावा या हेतूने कमलाकर म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला म्हात्रे यांनी आपल्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या लढाईत महापालिकेला आर्थिक मदत व्हावी म्हणून 50 हजार रुपयांचा धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपायुक्तांकडे सुपूर्त केला

कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात परिस्थिती गंभीर असताना अनेक दानशूर नागरिक पुढे येऊन कोरोना विरूद्ध लढण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करत आहेत. निश्चितच कौतुकाची बाब आहे. आजअखेर महापौर सहाय्यता निधीत 3,12,168 रुपये जमा झाले असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.