हॉटस्पॉट: – उरण करंज्यात दोन कमी शंभर कोरोनाग्रस्त

 

आणखी 44 नवे रुग्ण आढळले,उरण तालुक्याचे टेन्शन वाढले
पनवेल/ प्रतिनिधी: – बुधवारी उरण तालुक्यातील करंजा येथे आणखी नव्याने 44 रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांचा आकडा दोन कमी शंभर झाला आहे. करंजा हे गाव एक प्रकारे कोरोना हॉटस्पॉट बनत चालले आहे. यामुळे उरण तालुका पूर्णपणे हादरून गेला आहे. तसेच टेन्शनही वाढत चालले आहे. एकाच व्यक्तीपासून इतक्या मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना विषाणूंचे संक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे तसेच ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान जिल्हा व तालुका प्रशासनासमोर आहे.

करंजा याठिकाणी सर्वात अगोदर एक रुग्ण आढळला होता. त्याच्यापासून चार कुटुंबातील 21 जणांना कोरोना ची लागण झाली. त्यानंतर आणखी 27 जणांना या आजाराचे संक्रमण झाले. त्यामुळे उरण तालुका जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रेड झोन म्हणून जाहीर केला.परत पाच जणांची त्यामध्ये वाढ झाली.दरम्यान कोरोना विषाणूंची साखळी तुटता तुटत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी आणखी 44 जणांचे कोविंड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच गावातील रुग्णांचा आकडा शंभराच्या घरात पोहोचला. या सर्वांचे स्वॅब 11 मे रोजी तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरुवारी अहवाल प्राप्त झाला असून पंचवीस महिला आणि 19 पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णांना कामोठे एमजीएम येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात 27 नागरिक आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे.