अत्यावश्यक सेवेला संसर्ग:पनवेल मनपा हद्दीत नव्याने कोरोनाचे 20 रुग्ण

 


मुंबई पोलीस , बेस्ट, एपीएमसी मार्केट तसेच दवाखान्यात काम करणाऱ्यांचा समावेश
कुटुंबियांनाही मोठ्या प्रमाणात लागण
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल परिसरातून मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्याकरता जाणार्‍यांचा कोरोना काही केल्या पिच्छा सोडताना दिसत नाही. गुरुवारी पनवेल मनपा हद्दीत नव्याने वीस रुग्ण वाढले. त्यामध्ये मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे तसेच एपीएमसी मार्केट संबंधातील रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोना विषाणूंचा संसर्ग होत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत ठोस पावले उचलले गेले नाहीत. तर ही संख्या वाढतच जाईल अशी आजची स्थिती आहे.
खारघर , सेक्टर -१५ , घरकुल येथील ४७ वर्षीय १ व्यक्ती कोविंड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे .खारघर , सेक्टर -२१ . ज्ञानसाधना सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्तींना लागन झाले आहे. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख बेस्ट डपो , धारावी , मुंबई येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून याआधीच पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -११ , गुरुकुटीर कॉम्पलेक्स येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बेस्ट डेपो मुंबई येथे कंडक्टर म्हणून कार्यरत आहे . खारघर , सेक्टर -१० , यशवंत गायकर चाळ येथील ३२ वर्षीय १ व्यक्तीला कोरोना झाला आहे . सदर व्यक्ती एपीएमसी मार्केट , वाशी येथे टेम्पो ड्रायव्हर असून भाजीची ने – आण करण्याचे काम करीत आहे . जवळचा नातेवाईक याआधी कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्यापासूनच याला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -३५ . मयांक रेसीडन्सी येथील २३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पाझिटिक आलेली आहे . सदर व्यक्ती भाजीपाला विक्रता असून तो नेहमी एपीएमसी मार्केट , वाशी येथे भाजी खरेदीकामी जात होता . कामोठे , सेक्टर -१ ९ , विस्ता कॉर्नर येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -५२ , अशोका रेसिडन्सी येथील ४६ वर्षीय १ व्यक्तीला लागण झाली आहे . सदर व्यक्ती एच पीसीएल कंपनी , माहूल येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -१८ , तिरूपती एन्क्लेव्ह येथील ३८ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे पती पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -५ . मारूतीधाम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींना कोरोना झालेला आहे . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक , शाखा मानखुर्द येथे कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर – ९ई . सत्यसंस्कार सोसायटी येथील ४२ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला नायर हॉस्पीटल , मुंबई येथे नर्स म्हणून कार्यरत आहे . कामोठे , सेक्टर -३५ , साईसागर सोसायटी येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती टाटा हॉस्पीटल , मुंबई येथे मुकादम म्हणून कार्यरत आहे . कामोठे , सेक्टर -६ अ , विजयदिप अपार्टमेंट येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती दादर बेस्ट डेपो येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे . खारघर , सेक्टर बास्तुविहार सोसायटी येथील ४५ वर्षीय १ महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे पती बेस्ट डेपो . धारावी , मुंबई येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त कामोठे . सेक्टर -१० , अष्टविनायक कृपा सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आल्यानंतर जो.टी.हॉस्पीटल . मुंबई येथे उपचार घेऊन पुर्णपणे बरी होऊन त्याना घरी सोडण्यात आले आहे . याबाबतची माहिती शासनाकडून पनवेल महानगरपालिकेला आजरोजी प्राप्त झाली आहे . खारघर , सेक्टर -१५ , घरकुल कुंजविहार येथील ५५ वर्षीय व्यक्तीला कोव्हिडची लागण झाली आहे . ही व्यक्ती शिवाजी नगर गोवंडी पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे .नवीन पनवेल , सेक्टर -१३ . ए – टाईप येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती नवीन पनवेल यधे फळ विक्रीचा व्यवसाय करत आहे . फळ खरेदी करण्याच्या निमित्ताने अनेकवेळा ही व्यक्ती एपीएमसी मार्केट , वाशी येथे गेलेली आहे . त्याठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -११ . न्यू संकूल सोसायटी यथील २ ९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती पोटाच्या विकाराच्या उपचारासंबंधी अनेकवेळा बेलापूर येथील हॉस्पीटलमध्ये जात होती . सदर हॉस्पीटल मध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .

आठ रुग्ण कोरोना मुक्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 8 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यापैकी कामोठे 5, खारघर 2 आणि नवीन पनवेल मधील एका जणांचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.