दुःखद बातमी: पनवेल ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू

 


विचुंबेत एकाच कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल ग्रामीणमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. दुःखद बाब म्हणजे पाली देवद येथील एका 44 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे विचुंबेत  एकाच कुटुंबात पाच जणांना संसर्ग झाला आहे. त्यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे.
विचुंबे येथील ग्रीन व्हॅली सोसाटीत ३ ९ . ३५ , २३ १२ वर्षीय , १० वर्षीय अशा पाच व्यक्तींचा कोविड १९ रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला आहे . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हे याअगोदरच कोरोना बाधित झाले होते . सदर पाच व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कोप्रोली येथील फॉरच्युन गार्डन सोसायटीमध्ये ३६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती संत मुक्ताबाई रूग्णालय मुंबई या रूग्णालयातील कर्मचारी आहेत . कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .उलवे निलसिध्दी जोया , प्लॉट १८३. सेक्टर २०.येथील ५१ वर्षीय व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर रुग्ण कुलाबा येथे मुंबई पोलीस आहे . सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा

तीन रुग्ण बरे झाले
विचुंबे , साई निल दर्शन हाउसिंग सोसायटी येथील ३ ९ वर्षीय रुग्ण कोरणा मुक्त झाला आहे. विचुंबे , ओमकार पार्क ये येथील २ ९ वर्षीय व्यक्ती बरा झाल्याने उपजिल्हा रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे . विचुंबे , साई दर्शन अर्पाटमेंट , येथील ३५ वर्षीय व्यक्ती बरा झाल्याने उपजिल्हा रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे .