करंजाडेतील मुंबई पोलिसासह कुटुंबातील चौघांना कोरोना

 


पत्नी आणि दोन मुलांचा समावेश
उलवे येथील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला लागण
पनवेल ग्रामीणमध्ये 24 तासात नऊ रुग्ण
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल परिसरात राहणाऱ्या मुंबई पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोना ची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर त्यांचे कुटुंबीयही बाधित होत आहेत. शुक्रवारी करंजाडे येथे राहत असलेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाला. त्याचबरोबर त्यांची पत्नी आणि दोन मुलांना संसर्ग झाला. याशिवाय उलवे येथे राहणाऱ्या आणखी एका मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचे कोविंड19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये नव्याने नऊ रुग्णांची नोंद झाली.
पालीदेवद , सुकापूर ( 8 ) , निम्वेश्वर कुंज सोसायटीतील ६८ वर्षीय , ४१ वर्षीय , २० वर्षीय , १८ वर्षीय असे चार व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. आलेली आहे . या कुटुंबातील सदस्य हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर चार उलवे येथील भाग्यश्री हाउसिंग सोसायटी प्लॉट १०१ , सेक्टर १४ मध्ये २७ वर्षीय व्यक्ती कोविड –
१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर रुग्ण मुंबई येथे पोलीस आहे . करंजाडे वसाहतीतील जय शिवम आर्केड , प्लॉट २६ , सेक्टर २ , येथील ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे . ते कुलाबा , दादर , मुंबई येथे पोलीस आहेत. या कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . त्यांच्या कुटुंबातील ३६ वर्षीय , १७ वर्षीय , व १४ वर्षीय व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . हे त्यांची पत्नी आणि मुले आहेत. यांना एमजीएम हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.