धारावीतील कोरोना कळंबोलीतील  ‘संस्कृती’चा पाहुणा

 


कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा नातेवाईकांकडे पाहुणचार
बँक, बेस्ट आणि अत्यावश्यक सेवांमध्ये संसर्ग
तालुका पोलीस ठाण्यात आणखी एका महिलेला कोरोना
पनवेल महापालिका हद्दीत 24 तासात पंधरा नवे रुग्ण
पनवेल /प्रतिनिधी:- अत्यावश्यक सेवेसाठी पनवेल वरून मुंबईला अनेक जण जातात. त्यापैकी शेकडो जणांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झालेला आहे. कळंबोली सेक्टर 14 येथील संस्कृती सोसायटीमध्ये नेमके उलटे घडले. कोविड हॉटस्पॉट असलेल्या धारावीतुन कोरोना रू पाहुणा म्हणून आला आणि काही दिवस पाहुणचार घेतला. संबंधितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर हादरून गेला आहे. याशिवाय दररोजच्या प्रमाणे आजही अत्यावश्यक सेवेतील काहींना लागण झालेली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. गेल्या चोवीस तासात पनवेल मनपा हद्दीत एकूण नव्याने पंधरा रुग्ण वाढले आहेत.

संस्कृती अपार्टमेंट येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती धारावी , मुंबई येथे राहत असून गेल्या काही दिवसांपुर्वी तो कळंबोली येथील नातेवाईकांकडे राहण्यास आलेली आहे .या व्यक्तीला धारावी येथेच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे
कामोठे , सेक्टर -३५ . संकल्प सोसायटी मधील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक महिला मुंबई महानगरपालिका येथे लिपिक म्हणून कार्यरत असून ती याआधीच कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . खांदा कॉलनी , सेक्टर -६ . निळकंळ पार्क सोसायटी येथील ६४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती मर्चंट नेव्ही , मुंबई येथे कार्यरत आहे . कामोठे , सेक्टर -१० , विक्रम टॉवर येथील ५४ वर्षीय १ व्यक्तीला कोवाड झाला आहे . ही व्यक्ती मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील कार्यालयात सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहे . खारघर , सेक्टर -३५ एच , स्मित सोसायटी येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती मुंबई एअरपोर्ट येथे सीआयएसएफ मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे .कामोठे , सेक्टर -२२ , तिरूपती सोसायटी येथील ३१ वर्षीय १ महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे . सदर महिला नविन पनवेल येथील हॉस्पीटलमध्ये उपचाराकामी वारंवार जात होती . सदर हॉस्पीटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . पनवेल , तक्का , मोराज रिव्हरसाईड पार्क येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला तालुका पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . या पोलीस ठाण्यातील याअगोदर आणखी एक पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत. कळंबोली , सेक्टर -११ , गुरूकुटीर कॉम्लेक्स येथील ४५ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे पती वांद्रे बसडेपो , मुंबई येथे बस कंडक्टर म्हणून कार्यरत असून ते याआधी कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासून या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -११ . महादेव पाटील सोसायटी येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बेस्ट डेपो , मुंबई येथे कॅशियर म्हणून कार्यरत आहे . कामोठे येथील एका हॉस्पीटलमधील २४ वर्षीय १ व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे . सदर व्यक्तीला त्या हॉस्पीटलमधूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -१५ . गुरूकुल कुंजविहार येथील १५ वर्षीय १ मुलगी काव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर मुलीचे वडील शिवाजीनगर , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच पॉझिटिव्ह आलेले आहेत . कामोठे , सेक्टर -१६ . प्राईड सोसायटी येथील ५६ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही महिला बैंक ऑफ इंडिया , शाखा माजगाव , मुंबई येथे लिपिक पदावर कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -५ , सावली सोसायटी येथील ३१ वर्षीय महिलेला कोरोना ची बाधा झाली आहे . सदर महिलेचे पती बेस्ट डेपो , माहिम , मुंबई येथे कार्यरत असून त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -८ , वरदविनायक सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही महिला शताब्दी हॉस्पीटल , गोवंडी येथे एक्सरे टेक्मीशन म्हणून कार्यरत आहे .