कामोठेतील कोरोना संसर्ग शतकाच्या उंबरठ्या

 


पनवेल मनपा हद्दीत जवळपास अडीचशे रुग्ण
खारघर वसाहती ने अर्धशतक ओलांडले
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका हद्दीत आज पर्यंत 246 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या एकट्या कामोठ्यात 99 म्हणजेच एक कमी शतकभर रुग्ण सापडले आहेत. तर सायबर सिटी म्हणून ओळखले जाणाऱ्या खारघर ला आज पर्यंत57 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल नवीन पनवेल आणि कळंबोली चा नंबर लागतो. यापैकी जवळपास 90 टक्के रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्याकरता जाणारे व त्यांचे कुटुंबीय आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सर्वात अगोदर कामोठे वसाहतीत रुग्ण सापडला. परदेश वारी करून आलेल्या एका व्यक्तीला संसर्ग झाला होता. त्यानंतर या वसाहती ने आपला नंबर सोडला नाही. त्याचे प्रमुख कारण असे की 2 रेल्वे स्थानक आणि एक राष्ट्रीय महामार्ग कामोठे लगत आहे. त्यामुळे सहाजिकच कनेक्टिविटी च्या दृष्टिकोनातून मुंबईला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील विविध विभागात काम करीत असलेल्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, लॅब टेक्निशियन यांच्यासह इतर काही जण आहेत . त्यामुळे कामोठे वसाहतीत सर्वाधिक कोरोना संसर्ग झालेला आहे. बहुतांशी जनांच्या कुटुंबियांना कोरोना विषाणूंची लागण झाल्याने हा आकडा वाढलेला आहे. सुदैवाने स्थानिक समूह संसर्ग वसाहतीत झालेला नाही. खारघर वसाहतीत सुद्धा अत्यावश्यक सेवेतील अनेक जण राहतात. त्यांना कोरोनाची बाधा झाली. याव्यतिरिक्त कळंबोली वसाहतीत 27 आणि सीआयएस एफचे दहा जवान असे एकूण 37 वर आकड पोचला आहे. विशेष म्हणजे सीआयएसएफ चे सर्व जवान बरे झाले आहेत. या ठिकाणी बेस्ट कामगार मोठ्या प्रमाणात राहतात. नवीन पनवेल मध्ये आज पर्यंत31 रुग्ण सापडले. पनवेल शहरात 18 तळोजा चार कोरोना बाधीत सापडले आहेत.

112 रुग्ण झाले कोरोना मुक्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या अडीशे पर्यंत पोहोचले आहे. असे असले तरी आज पर्यंत एकूण 112 जण कोरोना मुक्त झाले आहेत. ही टक्केवारी 38 ते 40 इतकी आहे. एकंदरीतच रुग्णांची रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी दिलासादायक आहे .