तळोजा रॅपिड ॲक्शन फोर्स मध्येही कोरोनाचा शिरकाव

 


एका जवानाला  दवाखान्यातून झाला संसर्ग
दोन ऑर्थर रोड जेल पोलिसांनाही कोरोनाची लागण
नव्याने बारा रुग्णांची नोंद तर तितकेच जण झाले बरे
पनवेल/ प्रतिनिधी:- आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक संकट आणि देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या तळोजा येथील रॅपिड ॲक्शन फोर्स मध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर ए एफ मधील एका जवानाला दवाखान्यात गेल्याने संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर जेएनपीटी मध्ये काम करणाऱ्या एक कर्मचारी आणि दोन आर्थर रोड जेल पोलिसांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तळोजा रॅपिड ऍक्शन फोर्स च्या कॅम्प मधील ३४ जवान कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर जवान अपेंडिक्सचा त्रास असल्यामुळे उपचाराकामी वारंवार हॉस्पीटला जात होते . त्यावेळीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -३६ . स्वप्नपुर्ती सोसायटी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर रुग्ण ऑर्थररोड जेल , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -१० , मारूती एनक्लेव्ह येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोशिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ते जे.एन.पी.टी. उरण येथे कार्यरत आहे . कामोठे , सेक्टर -१ , अनिवृध्द आस्था सोसायटी येथील २८ वर्षीय १ व्यक्तीला कोरोना झालेला आहे . सदर व्यक्ती निर्मल नगर पोलिस स्टेशन , वांद्रे येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामोठे , सेक्टर -११ . हरिओम आर्केड येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती ऑर्थररोड जेल , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कळंबोली , सेक्टर – रई . एलजी – २ येथील ४४ वर्षीय व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली आहे . सदर व्यक्ती शिवाजी नगर , गोवंडी येथील बेस्ट डेपोमध्ये कार्यरत आहे. कामोठे , सेक्टर -१८ , हरिओम कॉम्प्लेक्स येथील ३ ९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीला टायफाईडचा त्रास असून ते उपचाराकामी हॉस्पीटलमध्ये जात होते . सदर हॉस्पीटलमध्येच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -५ . स्टार ए -१ सोसायटी येथील ४२ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव आलेली आहे . सदर महिलेचे पती मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -१५ . घरकुल मातृछाया सोसायटी येथील ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही व्यक्ती जीओ कंपनी , चेंबूर येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -१६ . सुरज सदन सोसायटी येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिङ -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला नेरुळ येथील एका डायग्नोसिस सेंटरमध्ये तपासणीसाठी वारंवार जात होती . सदर ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -६ . स्नेहल अपार्टमेंट येथील ४१ वर्षीय एका व्यक्तीचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे . सदर व्यक्ती दादर बेस्टडेपो येथे बेस्ट ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -३ ई . के.एल .५ येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती आष्टे लॉजेस्टीक कंपनी . रसायनी रोड येथे कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .

बारा जण रुग्णालयातून घरी
कामोठे वसाहतीतील 4, कळंबोली, खारघर, पनवेल येथील प्रत्येकी दोन , नवीन पनवेल व तळोजा येथील एक एक असे एकूण बारा रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.