नव्याने आढळले आठ .. बरे झाले तेरा

 


पनवेल ग्रामीण मध्ये काही चिंता आणि दिलासाही
कोनला चार रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण
पनवेल प्रतिनिधी: पनवेल ग्रामीणमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढतच आहे. शनिवारी नव्याने 8 रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे 13 जण बरे होऊन घरी गेले. कोन येथे एकाच ठिकाणी चार रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कोन येथील रमेश घरत चाळ मध्ये ३३ वर्षीय , ३७ वर्षीय , ३३ वर्षीय , ४० वर्षीय असे चार व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कामाच्या व राहण्याच्या ठिकाणचा एक सदस्य हे याआधी पॉझिटीव्ह आलेले होते . उलवे ( १ ) , निलसिध्दी जोया , प्लॉट १८३. सेक्टर २० , येथील २१ वर्षीय व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधीच बाधित रुग्ण आहे . पालीदवेद – सुकापूर मधील , न्यु कार्तीक सोसायटी , येथील ३३ वर्षीय व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती पनवेल येथे पोलीस कर्मचारी आहे . सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . देवद ( १ ) , युनाईटेड होम्स , येथील २ ९ वर्षीय व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती चेंबूर , मुंबई येथे खाजगी मेडीकल दुकानात कार्यरत आहे . करंजाडे शिवकृपा सेक्टर ६ , येथील ३ ९ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आलेली आहे . ही व्यक्ती परेल , मुंबई येथे खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत आहे . सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .
चौकट
तेरा रुग्ण कोरोना मुक्त
विचुंबे, उलवे, उसर्ली येथील प्रत्येकी तीन करंजाडे आणि पाली देवद मधील रहिवासी असलेले एक एक असे एकूण 13 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.