माथाडींच्या ‘भुकेचा ‘ काहीसा भार सामाजिक बांधिलकी ने उचलला

रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली स्टील मार्केट मध्ये सोशल डिस्टन्सचा अवलंब

पनवेल प्रतिनिधी:- कळंबोली स्टील मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार काम करतात. दरम्यान लॉक डाऊन च्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली. काहीजण गोडाऊन मध्ये राहतात अशांना रेशन ची गरज होती. त्यानुसार रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने अशा गरजू माथाडी कामगारांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचे भुकेचा भार काही प्रमाणात उचलला. शुक्रवारी सामाजिक अंतर ठेवून प्रतिष्ठानच्या वतीने वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कळंबोलीत आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. याठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोखंड येते आणि जाते. मालाची लोडिंग अनलोडिंग येथे केली जाते. प्लेट, सळई त्याचबरोबर इतर प्रकारच्या लोखंडांचा व्यापार या मार्केटमध्ये होतो. याठिकाणी मोठ्या संख्येने माथाडी कामगार काम करतात. त्यामध्ये परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कळंबोली स्टील मार्केट बंद होते. क्रेनच्या सहाय्याने लोडिंग अनलोडींगला परवानगी द्यावी जेणेकरून, माथाडी कामगारांच्या हाताला काम मिळेल. तसेच लोखंडाची संबंधित असलेले उद्योगधंदे ही सुरू राहतील. या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्तीच्या तत्वावर कळंबोली स्टील मार्केटमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास जवळ यांनी केली होती. त्यानुसार काही अटी व नियम तसेच सोशल डिस्टन्स राखण्याच्या तत्वावर मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार काही प्रमाणात कामांना सुरुवात झाली आहे. दरम्यान लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसल्याने अनेक माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यापैकी काहींना रामदास शेवाळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून तांदूळ, गव्हाचे पीठ, बटाटे ,कांदा त्याचबरोबर इतर जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी रामदास शेवाळे, प्रतिष्ठानचे सल्लागार अॅड श्रीनिवास क्षिरसागर , राजू दाव यांच्यासह स्टील व्यापारी राजू भाई दवे , परवीन गोयल , मुकादम सुभाष ढवळे, बालाजी खोडेवाल
उपस्थित होते.