दुःखद बातमी: खारघर मध्ये 32 वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू

नवीन पनवेलच्या ए टाईपमध्ये कोरोनाचा शिरकाव
सहा जणांचे कोविड रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
किराणा दुकानदार आणि किरकोळ फळ विक्रेत्यांचा समावेश
24 तासात पनवेल मनपा हद्दीत नव्याने 13 रुग्णांची नोंद
पनवेल प्रतिनिधी:- खारघर वसाहतीत एका 32 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे मनपा हद्दीतील मृत्यूचा आकडा आठ वर पोहोचला आहे. तसेच नवीन पनवेल मध्ये आता कोरूना विषाणूंचा प्रभाव अधिकच वाढताना दिसत आहे. त्यातली त्यात अल्प उत्पादन गटातील ए टाईप मध्ये हजार या महामारी रोगाने शिरकाव केला आहे. रविवारी चार फळविक्रेते आणि दोन किराणा मालाच्या दुकानातील व्यक्तींना लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासात पनवेल मनपा हद्दीत एकूण 13 रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये कोरोना ग्रस्तांच्या कुटुंबियांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामुळे हा आकडा अडीचशेच्या वरती पोहचला आहे.

खारघर , सेक्टर -३५ , स्मित को.ऑप.सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबई एअरपोर्ट येथे सीआयएसएफ सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. याआधीच ते पॉझिटिव्ह आलेले आहेत . खारघर , सेक्टर -१० , सनसिटी अवेन्यू सोसायटी येथील २७ वर्षीय १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे वडील बँक ऑफ इंडिया , शाखा माजगांव , मुंबई येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून याआधीच त्यांना लागण झालेली आहे . कळंबोली , सेक्टर -१५ , ब्लॅक स्मिथ कॉर्नर येथील २७ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती एस.डी.एल कंपनी , म्हापे येथे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे . नविन पनवेल , सेक्टर -१३ , ए टाईप चाळ येथील एकाच घरातील ४ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदरचे चारही जण किरकोळ फळ विक्रेते असून ते वारंवार फळे खरेदीकामी एपीएमसी मार्केट , वाशी येथे जात होते . तसेच या घरातील आणखी एक व्यक्ती याआधीच कोव्हिड झालेला आहे . कामोठे , सेक्टर -१० , विक्रम टॉवर येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचे पती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असून याआधीच संसर्ग झालेला आहे. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -१५ . मकरंद विहार सोसायटी येथील १३ वर्षीय मुलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे . सदर मुलाचे वडील चेंबूर पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच मुलाला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -३६ , तिरूपती कॉम्प्लेक्स येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती ताडदेव पोलिस हेडक्वाटर्स , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . नविन पनवेल , सेक्टर -१३ , ए टाईप चाळ , वसंत निवास येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहेत . सदरच्या दोन्ही व्यक्ती किराणा दुकान चालवितात . यापुर्वी सदर भागातील अनेक व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .

32 वर्षीय महिलेचा बळी
खारघर , सेक्टर -१० , लविस्ता सोसायटी येथील ३२ वर्षीय १ महिला कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली होती . ही महिला दिनांक ११ मे रोजी गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती . या रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.