मुंबईतून पाली देवदला आलेल्या दोन मुलांना कोरोनापनवेल ग्रामीणमध्ये नव्याने नऊ रुग्णांची नोंद
करंजा येथेही सापडले 16 पॉझिटिव्ह
पनवेल /प्रतिनिधी: पनवेल ग्रामीण मध्ये सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतून पाली देवद येथे आलेल्या दोन मुलांना कोरोना झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासात पनवेल ग्रामीणमध्ये नव्याने नऊ रुग्ण आढळून आले. तर उरण करंजा येथे सोळा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणखीन चिंता वाढली आहे.

कोपोली , फॉच्युन गार्डन , ता . पनवेल येथील ८१ वर्षीय , ४० वर्षीय ०२ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी पॉझिटीव्ह आलेले होते . सदर दोन्ही व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . शिरढोण , ता . पनवेल येथील २७ वर्षीय एका व्यक्तीला कोरोना झाला आहे. हा जवान सी.आय.एस.एफ. उरण येथे कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . विचुंबे , कृष्ण वंदना सोसायटी , येथील ५५ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड -१९ पॉझिटीव्ह आलेली आहे . ४. वहाळ , युनाईटेड होम्स , येथील ६६ वर्षीय व्यक्तीला कोविड संसर्ग आहे .पालीदेवद – सुकापूर , स्वामी सदन सोसायटीत १२ व व ८ वर्षीय मुलांचे कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत . दोघेही वडाळा , मुंबई येथून प्रवास करून पालीदेवद येथे आलेल्या आहेत .पालीदेवद – सुकापूर , मंगल मुर्ती निवास येथील ५२ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . केळवणे , ता . पनवेल येथील ५८ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . ८. करंजा , सुरकीचापाडा , कासवलेपाडा , कोंढरी पाडा , नवापाडा , ता.उरण येथे १६ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत . सदर व्यक्तींच्या प्रवासाबाबत कोणतीही माहिती नाही . परंतू सर्व पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यावाबत प्राथमिक निष्कर्ष आहे . त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे .