सभागृह नेत्यांचा वाढदिवस वाढवणार रोगप्रतिकारक शक्ती

 


परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर मध्ये अर्सेनिक अल्बम 30 औषधाचे वाटप होणार
स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांची माहिती
पनवेल प्रतिनिधी:- महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर मध्ये
नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी दिली.
सोमवार 18 मे रोजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस आहे. कोरोंनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका हद्दीत अडीचशे पेक्षा जास्त कोरोंनाचे रुग्ण सापडले आहेत. 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. कारण याठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला अनेक जण जातात. त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग काय होत आहे.
नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घेतल्यास कोरोंनावर मात केली जाऊ शकते . आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जण या आजारातून बरे झाले आहेत. नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुष्य मंत्रालया च्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोमवार 18 मे रोजी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त खारघर येथे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील अर्सेनिक अल्बम 30 ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप करणार आहेत.