चिंताजनक बातमी: कोरोनाने आणखी दोन जणांचा मृत्यू

 


पनवेल मनपा हद्दीत बळींचा आकडा पोचला दहावर
24 तासात नव्याने बारा रुग्णांची नोंद
तुर्भे वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याला संसर्ग
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल मनपा हद्दीत ज्याप्रमाणे कोरोना चे रुग्ण वाढत असल्याची चिंता आहे. त्याचबरोबर बळींचा आकडा ही दहावर पोचल्याने परिस्थिती बिकट बनत चालली आहे. सोमवारी कलंबोली आणि कामोठे येथील दोघांचा या महामारी रोगाने बळी घेतला. तर गेल्या चोवीस तासात बारा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये तुर्भे वाहतूक शाखेच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस दलातही आता कोरोनाने शिरकाव केला आहे.

कळंबोली , सेक्टर -११ , गुरूकुटीर कॉम्प्लेक्स येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली होती . या रुग्णाचे रविवारी सायंकाळी दुख :द निधन झाले आहे . त्यामुळे कळंबोली वसाहतीत भितीदायक वातावरण आहे. त्याचबरोबर कामोठे . सेक्टर -११ , महादेव पाटील सोसायटी मधील एका ५७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णाचेही ही 17 मे रोजी दुर्दैवी निधन झाले पॉझिटिव्ह आलेली होती . हया व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले.
खारघर , सेक्टर -२० , हावरे गुलमोहर येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती नायगावं पोलीस मुख्यालय येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . खारघर , सेक्टर -१५ . घरकुल मातृछाया सोसायटीमधील एकाच कुटूंबातील ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख हे जिओ कंपनी घाटकोपर येथे अभियंता म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -५ . ए .१ सोसायटी मधील ३० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामोठे सेक्टर -१० . मारुती एन्क्लेव्ह या सोसायटीमधील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिङ -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख हे जे.एन.पी.टी. उरण येथे कार्यरत असून याआधीच ते कोकिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . कामोठे , सेक्टर -११ , महादेव पाटील बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत , सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख बेस्ट सायन डेपोमध्ये कॅशियर म्हणून काम करीत होते . कामोठे , सेक्टर -१७ येथील शिव कल्पतरू सोसायटी , आर.के.बिल्डींग -४ येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे . कळंबोली , सेक्टर -१५ येथीन पाम विहार सोसायटी मधील ३६ वर्षीय एकाला कोणाचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्ती नवी मुंबई पोलिस दलातील तुर्भे वाहतूक शाखेत, हवालदार म्हणून कार्यरत आहे . सदर

दहा रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील 10 रुग्णांना सोमवारी घरी सोडण्यात आले. खारघर, कामोठे येथील प्रत्येकी तीन, कळंबोलीतील दोन आणि पनवेल व नवीन पनवेल येथील प्रत्येकी एक एक रुग्णांचा समावेश आहे