पनवेल ग्रामीणमध्ये नव्याने सात रुग्णांची भर

 


उरण लाही दोन जण पॉझिटिव्ह
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोमवारी नव्याने सात जणांची भर पडली. पाली देवद याठिकाणी एकाच कुटुंबात तीन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. उरण तालुक्यात सुद्धा करंजा आणि पागोटे येथील दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत.

पालीदेवद येथील न्यु कार्तीक सोसायटी मधील ३७ , ९ , व ४ वर्षीय असे ३ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधीच पॉझिटीव्ह आलेले होते . सदर तीन्ही व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . करंजाडे , पर्ल रेसिडेन्सी , प्लॉट ६३ , सेक्टर २ अ येथील ४१ वर्षीय १ व्यक्तीला कोविड झाला आहे . सदर व्यक्ती नायगांव , मुंबई पोलीस विभागात कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . विचुंबे , साई ऐश्वर्या सोसायटीतील ३ ९ वर्षीय १ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला आहे . सदर व्यक्ती बी.पी.सी.एल. , मुंबई येथे कार्यरत आहे . उमरोली , निर्मीती गार्डन , बिल्डींग नं ५ येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्याचे काम सुरू आहे . ५. पालीदेवद साईकृपा सोसायटीमधील ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला आहे. सदर व्यक्ती पी.के.सी. हॉस्पिटल , वाशी येथे कार्यरत आहे . सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . करंजा , सुरकीचापाडा , ता.उरण येथील ५ ९ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . या व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . पागोटे , ता.उरण येथील ६५ वर्षीय एका व्यक्तीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्याचे काम सुरू आहे .

करंजा येथील नऊ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

सोमवारी करंजा येथील नऊ जणांना कामोठे एमजीएम हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे अंतिम रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले . यामुळे उरणला काहीसा दिलासा मिळाला आहे