खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढणार

 


साठ वर्षावरील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम – ३० गोळ्यांचे वाटप
प्रभात समिती सभापती संजय भोपी यांचा पुढाकार
पनवेल /प्रतिनिधी:- वयोवृद्धांना कोरोना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते पनवेल परिसरात असे अनेक वयस्कर रुग्ण सापडले आहेत. दरम्यान रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खांदा वसाहतीतील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्सेनिक अल्बम – ३० गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी या कामी पुढाकार घेतला आहे.

पनवेल परिसरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खांदा वसाहतीतील सुद्धा काही रुग्ण सापडलेला आहेत. तर एकाचा या महामारी रोगामुळे मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या त्याचबरोबर इतर आजार असल्याने कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्याचबरोबर वयस्कर व्यक्तींची कोविंड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम – ३० या होमीयोपॅथीक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत . या नुसार खांदा कॉलनीमध्ये स्थानिक नगरसेवक म्हणून संजय भोपी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना या गोळ्या देण्यात येत आहेत. जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोना विषाणूंचे संक्रमण होणार नाही. यासाठी आपण पनवेल महानगर पालिकेकडे अर्ज केला असल्याचे भोपी यांनी सांगितले

 

खांदेश्वर पोलिसांना गोळ्या उपलब्ध करून दिल्या

खांदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधवासाठी डॉ. संतोष आगलावे यांनी उपलब्ध करून दिलेल्या गोळ्यांचे पॅकेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द करून करण्यात आले. याप्रसंगी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी साहेब यांच्यासमवेत डॉ. संतोष आगलावे हेही उपस्थित होते.