दिलासादायक: पनवेल ग्रामीणमध्ये फक्त दोन रुग्णांची नोंद


आठ जणांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
उरणमध्ये नव्याने दोन रुग्ण सापडले ,तर चार जणांना घरी सोडले
पनवेल /प्रतिनिधी: – गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रा बरोबरच ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णांची संख्या वाढत चालली होती. मात्र मंगळवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला.24 तासात फक्त दोनच नगर रुग्णांची नोंद झाली. तर आठ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उरण तालुक्यात नव्याने दोन रुग्ण आढळून आले. तर चार जणांना घरी सोडण्यात आले.
पाली देवद , पुष्प नारायण कॉम्पलेक्स येथील ४२ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कामाच्या ठीकाणी एक सहकारी हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर व्यक्ती नायगाव , मुंबई पोलीस विभागात येथे कार्यरत आहे .उलवे , स्काय अव्हेन्यु हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट ९ २ , सेक्टर ९ येथील २६ वर्षीय ०१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीची कांन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्याचे काम सुरू आहे . जेएनपीटी टाऊनशिप , सेक्टर -१ , बी -२५ , ता . उरण येथील ४० वर्षीय व २० वर्षीय २ जन कोरोना बाधित झाले आहेत . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते .

पनवेल उरण मधील बारा जण झाले बरे
पनवेल ग्रामीण मधून आठ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये उलवे येथील सहा जण तर करंजाडे येथील दोन जणांचा समावेश आहे. तर करंजा येथील चार जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.