धक्कादायक बातमी: पाच स्वच्छता कामगारांना कोरोना

 


मुंबईनंतर पनवेलची ही स्वच्छता यंत्रणा कोविडच्या सावटाखाली
24 तासात १८ रुग्णांची नव्याने नोंद
पनवेल/ प्रतिनिधी:- मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात सफाई कामगारांना संसर्ग झाला आहे. आता पनवेल परिसरातील स्वच्छता कामगारांवर सुद्धा कोविडचे सावट पसरले आहे. पनवेल आणि काळुंद्रे येथे राहणाऱ्या पाच स्वच्छता कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्ग झालेले कामगार पनवेल महानगरपालिकेकडे काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र प्रसिद्धीपत्रकात मनपाने याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असल्याचे त्यामध्ये उल्लेख आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासात नव्याने 18 रुग्णांची नोंद झाली आहे.

कळंबाली , सेक्टर – २ई , सत्य संस्कार सोसायटी येथील २३ वर्षीय १ महिला कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . या महिलेच्या कुटुंबातील एक महिला नायर हॉस्पीटल , मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून याआधीच ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . तिच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . पनवेल , तक्का , कल्पतरू रिव्हरसाईड सोसायटी कावेरी बिल्डिंग येथील ४० वर्षीय १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे . ही महिला हृदय विकाराच्या आजारावर उपचार घेण्याकरीता पनवेल येथील एका हॉस्पीटलमध्ये जात होती . सदर हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -१८ हरिओम कॉम्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. या दोघांपैकी एक व्यक्ती बांद्र बेस्ट डेपो येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाला असून त्यांच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला सुध्दा संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -२ . विघ्नहर्ता सोसायटी येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती भविष्य निर्वाह निधी कार्यालय , वागळे इस्टेट , ठाणे येथे वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -२२ . हावरे ग्रीनपार्क येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती देवनार पोलिस स्टेशन , गोवंडी येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असावा. खारघर , सेक्टर -८ . शांतीनिकेतन सोसायटी येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती वडाळा ट्रक टनिल , मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामोठे , सेक्टर -५ . स्टार ए वन सोसायटी येथील ५५ वर्षीय महिला कॉव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिलेचा मुलगा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत आहे . त्याच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -२१ , शुभ आर्केड येथील २२ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिक आलेली आहे . सदर महिला कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -१५ , पामविहार सोसायटी – १५ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख तुर्भे पोलिस स्टेशन , नवी मुंबई येथे ट्रॅफिक हवालदार म्हणून कार्यरत असून याआधीच ते काविड -१ ९ पॉझिटिक आलेले आहेत . त्या व्यक्ती पासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -३ ई . टिस्को स्टील यार्ड येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती ट्रक ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून कळंबोली ते उरण ट्रक चालवित होती . या दरम्यानच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर – रई , तिरूपती कॉम्प्लेक्स येथील ६० वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला सांताक्रुझ . मुंबई येथून गेल्या काही दिवसांपूर्वी कळंबोली येथे आलेली आहे . सदर महिलेला सांताक्रुझ येथेच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .

स्वच्छता विषयक कर्मचारी!

काळंद्रे व पनवेल येथील एकूण ५ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर व्यक्ती स्वच्छता विषयक काम करणारे कर्मचारी आहेत . कामाच्या ठिकाणीच त्या पाच जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . हे नेमके कुठे स्वच्छता विषयक कर्मचारी आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

सात रुग्ण हॉस्पिटल मधून डिस्चार्ज
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून एकूण सात जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आले. त्यामध्ये कामोठे वसाहतीतील चार आणि नवीन पनवेल, खारघर व तळोजा येथील प्रत्येकी रुग्णांचा समावेश आहे.