पारनेरच्या कोविड योद्धयाने कोरोनाला मुंबईत हरवले

 

मुलालाही मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई पोलीस संजय पुजारी यांचे रहिवाशांनी केले दणक्यात स्वागत
नाना करंजुले
पनवेल/ प्रतिनिधी:- मूळचे पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील संजय पुजारी मुंबई पोलिस दलात काम करतात. कोरोना विषाणुसी दोन हात करताना त्यांनाच लागण.त्यांच्याकडून पत्नी आणि दोन मुलांनाही संसर्ग झाला होता. दरम्यान माजी सैनिक आणि आता नायगाव पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पुजारी यांनी कोरोनावर मात करीत पारनेरच्या संघर्षाच्या इतिहासाला एक प्रकारे उजाळा दिला. त्यांच्या पनवेल करंजाडे येथील सोसायटीतील रहिवाशांनी मंगळवारी अक्षरशा: फटाक्यांची अतिषबाजी आणि फुलांची उधळण करत या कोवीड योद्ध्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आमदार निलेश लंके यांनी वारंवार या महामारी रोगा विरोधात लढण्यासाठी पारनेरच्या या भुमिपुत्रा ला फोनच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल
पारनेर तालुक्याला सैनिकांची परंपरा आहे. पुणेवाडी या ठिकाणचे मूळ रहिवासी असलेल्या संजय पुजारी यांनी साडे सोळा वर्ष भारतीय सैन्यात काम केले. सैन्य दलात निवृत्त झाल्यानंतर ते मुंबई पोलीस मध्ये भरती झाले. ते नायगाव येथे पोलीस मुख्यालय कर्तव्यावर होते. करंजाडे वसाहतीतील सेक्टर 2 येथील जय शिवम आर्केड येथे ते राहतात. त्यांना कामावर येताना जाताना कोरोचा संसर्ग झाला. त्यांच्यापासून कुटुंबीयांनाही कोरोना विषाणूंचे संक्रमण झाले. दरम्यान त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. अगोदर सैन्यात भारत मातेचे रक्षण करणारे हे जवान मुंबई पोलिस दलात उत्तम काम करत आहेत. शत्रूंशी दोन हात करणारे, त्याचबरोबर मुंबईत कोरोना विरोधात खडा पहारा देणाऱ्या या कोवाड योद्धयांने मंगळवारी कोरोनाला चार मुंडया चित केले. त्याचबरोबर आपल्या वडिलांबरोबर मुलानेही या महामारी रोगाचा पराभव केला. या दोघांचेही सोसायटीतील रहिवाशांनी सायंकाळी जंगी स्वागत केले. फटाके वाजवून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही या कोविड योद्धयाचे फोन करून अभिनंदन केले. ऑनलाईन बातमी च्या वतीने या जिगरबाज पोलीस कर्मचारी आणि माजी सैनिकाला सलाम.