मद्यपींसाठी मोठी बातमी: पनवेल मध्ये मिळणार ऑनलाईन दारू

पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडून परवानगी
कंटेनमेंट झोनमध्ये मध्य विक्रीस परवानगी नाकारली
पनवेल /प्रतिनिधी: पनवेल महानगरपालिका हद्दीत ऑनलाइन मद्य विक्रिस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये उदाहरणार्थ कामोठे येथे मुभा देण्यात आलेले नाही. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार दुकानदारांना ही विक्री करता येणार आहे.

राज्य शासनाने मद्य विक्री यावरच विविध अटी आणि शर्ती राखून परवानगी दिली आहे. रायगड जिल्हा अधिकाऱ्यांनीही मद्याची दुकान उघडण्यात मुभा दिली आहे. मात्र मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दारूची दुकाने उघडण्यास मनाई केली होती. त्यामुळे पनवेल परिसरातील वाईन शॉप आजही लाॅक डाऊन आहेत. दरम्यान राज्य शासनाने ऑनलाइन मध्य विक्री याअगोदरच हिरवा कंदील दिला आहे. त्या आदेशानुसार मंगळवारपासून पनवेल महानगरपालिका हद्दीत ऑनलाइन मद्य विक्रीस मुभा देण्यात आली आहे.

सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर व्यवहार सुरु ठेवता येणार नाहीत. अनुज्ञप्ती सुरु झाल्यानंतर जर भविष्यात एखाद्या ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले , तर त्या ठिकाणी ऑनलाईन विक्री बंद करण्यात येईल. करण्यात येतील . विक्रेता डिलिव्हरी करणाऱ्याला मास्क , सॅनिटायझर , हेन्ड ग्लोन अशा साधनांचा वापर करणे अनिवार्य असेल . संबंधित व्यवसाय धारकांना पनवेल महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना आवश्यक राहिल . दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र देणेत यावे , दुकानासमोर दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही . अनुज्ञप्तीमधुन मद्यविक्री करताना दारुबंदी कायदा १ ९ ४ ९ चे नियम व तरतुदीचे पालन करण्याचे सूचित करण्यात आले आहे . सर्व नोकरांची धर्मल स्कॅनिंग करावी मद्याची मागणी नोंदविण्यासाठी परवाना धारकाने ग्राहकांसाठी व्हाट्सअप लघुसंदेश दुरध्वनी भ्रमणध्वनी यांचा वापर करावा . मागणी प्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी अनुज्ञप्ती धारकाने त्यांचे वितरण व्यवस्था करावी व वितरण व्यवस्थेसाठी आवश्यकते मनुष्यबळ ठेवाये . कामकाजावर येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोग्य सेतु अप वापरण्यासाठी प्रोत्साहीत करावे . पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी . सदरकामी लागणान्या सर्व शासकीय परवानग्या आपण परस्पर घ्याव्यात . आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य , मुबई यांचे लॉकडाऊन कालावधीत घरपोच मद्यविक्रीसाठी लागू केलेल मार्गदर्शक तत्वे पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.