दुःखद बातमी: – आणखी दोन महिलांचा कोरोना ने मृत्यू


कळंबोली वसाहतीत झोपडपट्टीमध्ये ही एक रुग्ण आढळला
मनपा हद्दीत सोळा नवीन नवीन रुग्णांची नोंद
एकोणीस जण कोविड मुक्त झाले
पनवेल/ प्रतिनिधी: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे दोन आकडी म्हणजेच सोळा रुग्ण सापडले. धक्कादायक बाब म्हणजे आणखी दोन महिलांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या बारा वर पोचली आहे. दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे कळंबोली वसाहतीत झोपडपट्टीमध्ये एकाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कामोठे , सेक्टर -७ , जयधनराज सोसायटी येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली होती . ही महिला उशीराने हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती. तिला रक्तदाबाचा त्रास होता. परंतु मंगळवारी संबंधित रुग्णाचे दुर्दैवी निधन झाले . सदर हॉस्पीटलमधून या महिलेबाबतची माहिती पनवेल महानगरपालिकेला बुधवारी प्राप्त झाली आहे . तळोजा , फेज -१ . अमर फार्मोनी येथील ६३ वर्षीय १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली होती . सदर महिलेचे अवयव निकामी झाल्याने १ ९ मे २०२० रोजी दुःखद निधन झाले आहे . वृद्ध महिलेला मधुमेहाचा त्रास होता.

कामोठे सेक्टर -१२ , गगनगिरी अपार्टमेंट येथील ३४ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -७ . श्री.गणेश कृपा सोसायटी येथील ३ ९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती सायन हॉस्पीटल , मुंबई येथे वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नविन पनवेल , सेक्टर – ९ धनलक्ष्मी अपार्टमेंट येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नविन पनवेल , सेक्टर -१३ , ए – टाईप वसंत निवास येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . या कुटुंबातील दोन व्यक्ती याआधीच कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -७ , श्रीराम आर्केड सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा एपीएमसी मार्केट , वाशी येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून कामाच्या ठिकाणीच सदर व्यक्तीला व त्याच्यापासून घरातील इतर चार जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -१२ , गुरूव्दारा झोपडपट्टी येथील २१ वर्षीय १ व्यक्ती कोबिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कळंबोली , सेक्टर -१५ , बनकस्मीथ कॉर्नर -२ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . या कुटुंबातील कुटुंब प्रमुख याआधीच कोव्हिड -१ ९ पॉझिटिव आलेला आहे . त्यांच्यापासूनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे .

एकोणीस जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
पनवेल महानगरपालिका हद्दीतील १ ९ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आले. कामोठे येथील ५ खारघर वसाहतीतील ७ ,तळोजा येथील ४ पुर्णपणे नवीन पनवेल मधील २ व पनवेल घरातील १ जणाचा समावेश आहे.