नवनियुक्त महापालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारला

 


मावळते आयुक्त गणेश देशमुख यांना निरोप
पनवेल प्रतिनिधी: – पनवेल महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारी गणेश देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमाल उपस्थित होत्या. त्याचबरोबर मावळते आयुक्तांना निरोपही देण्यात आला.
सुधाकर देशमुख हे अतिशय अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे प्रशासकीय मोठा अनुभव आहे. ते या अगोदर उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त होते. त्या ठिकाणी त्यांनी अनेक विकास कामे केली. त्याचबरोबर प्रशासकीय चुणूक दाखवली. बुधवारी दुपारी देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. गणेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान सुधाकर देशमुख यांचा समोर असणार आहे. याव्यतिरिक्त या नव्या महापालिकेचा गाडा रूळावर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नव्या आयुक्तांना योग्यरीतीने प्रशासकीय घडी बसवावी लागणार आहे.