पनवेल मनपा आयुक्तांची ठाण्याला बदली


सुधाकर देशमुख पनवेलचे नवे आयुक्त
पनवेल /प्रतिनिधी: पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनुभवी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  उशिरा या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप शासनाचा अध्यादेश हाती पडलेला नाही.
डॉ सुधाकर शिंदे यांच्या बदलीनंतर गणेश देशमुख यांना नांदेड महानगरपालिकेतून पनवेल चे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांचे ठाणे महानगरपालिकेचा अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या बदल्या झालेल्या आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेलच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. राजेंद्र निंबाळकर आणि डाॅ सुधाकर शिंदे यांची2017 आदला बदली करण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी तात्पुरती बदली करण्यात आली होती. पनवेल महापालिकेला निंबाळकर आणि शिंदे यांच्या नंतर पुन्हा उल्हासनगर येथुन तिसरे आयुक्त पाठवण्यात आले आहेत. पनवेल मनपाला सुधाकर नावाचे दुसऱ्यांदा आयुक्त मिळाले आहेत . परंतु त्यांचे आडनाव देशमुख आहे. अर्थात एक देशमुख गेले आणि त्यांच्या जागी दुसऱ्या देशमुखांची शासनाने वर्णी लावली अशी चर्चा सध्या पनवेल मध्ये सुरू आहे.