चिंताजनक. कोरोना विषाणू रसायनी च्या वाटेवर

 


कसळखंड, आष्टे या गावात संसर्ग झाल्याने खळबळ
पळस्पे चिखले येथेही कोरोनाचे रुग्ण आढळले
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल ग्रामीणमध्ये कोरोना संसर्गाचा विस्तार वाढत चालला आहे. चिंताजनक बाब म्हणजे रसायनी च्या वाटेवर असलेल्या कसळ खंड आणि आष्टे येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर पळस्पे आणि चिखले या गावांमध्ये नव्याने रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 48 तासात पनवेल ग्रामीणमध्ये नव्याने 13 रुग्ण सापडले.

पालीदेवद – सुकापूर श्रीराम समर्थ बिल्डींग , येथील ३० वर्षीय , २७ वर्षीय , २५ वर्षीय . १.५ वर्षीय असे चार व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर चार व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .वहाळ येथील ६३ वर्षीय व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . ३. कसळखंड . येथील ३३ वर्षीय , ३७ वर्षीय , असे दोन व्यक्ती कोविड- १ ९ पोझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी एक सहकारी हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते.सदर दोन व्यक्तीस त्याच्या कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . आष्टे येथील २ ९ वर्षीय , व्यक्ती कोविड १ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कामाच्य ठिकाणी एक सहकारी हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर व्यक्तीस त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . पळस्पे येथील ४१ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . चिखले येथील ७ ९ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टेक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . उलवे मापले विवा , प्लॉट नं .१० . सेक्टर ३. येथील ३७ वर्षीय , व्यक्ती कोविड १ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . विचुंबे, तेजस निवास , आशापूर मेडीकल , ४ था मजला , येथील २० वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे .

आठरा रुग्ण बरे होऊन घरी

पनवेल ग्रामीण मधील दिलासादायक बाब म्हणजे १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे