चिंताजनक: मृतांचा आकडा रोज वाढतोय

 


कळंबोली कामोठे येथे दोघांचा मृत्यू
महापालिका हद्दीत नव्याने 13 रुग्णांची नोंद
पनवेल /प्रतिनिधी: पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या रुग्णांबरोबर मृतांची संख्याही वाढत चालली आहे. गुरुवारी कामोठे आणि कलंबोली येथे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात 13 रुग्णांची नव्याने नोंद झाली. तर सोळा जणांना घरी सोडण्यात आले.

कळंबोली , सेक्टर – र ई , एक्स सर्विस मन सोसायटी यधील ६५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली होती . सदर व्यक्तीला याअगोदरच पक्षघाताचा झटका आला होता. दरम्यान गुरुवारी सकाळी यांचे दुःखद निधन झाले. ते कोरोनाचे बळी ठरले. कामोठे , सेक्टर -७ . श्रीराम आर्केड येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली होती . त्यांचेही गुरुवारी पहाटे दुख : द निधन झाले आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा 14 वर पोहोचला आहे.
कामोठे , सक्टर -३५ , रिध्दी सिध्दी अपार्टमेंट येथील ३ ९ वर्षीय महिला कॉव्हिड -२ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला शताब्दी हॉस्पीटल , गोवंडी येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -८ , गुडवील गार्डन सोसायटी येथील ३५ वर्षीय १ महिला कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला शताब्दी हॉस्पीटल , गोवंडी येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -१८ , हरिओम कॉम्प्लेक्स येथील १३ वर्षीय १ मुलगा कोकिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेला आहे . हया मुलाचे वडील याआधीच कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच मुलाना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे येथील एका हॉस्पोटलमध्ये कार्यरत असलेल्या २ व्यक्ती कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . हया व्यक्तींना त्या हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर – ई . के.एल .५ /२ ९ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख लजिस्टीक कंपनी , आष्टे येथे कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यांच्यापासूनच या तीन जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -७ , पटेल हेरिटेज येथील १ ९ वर्षीय १ मुलगा कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेला आहे . सदर मुलगा खारघर सेक्टर -७ येथील एका सुपर मार्केटमध्ये अनेकवेळा खरेदीकामी गेला आहे . त्या ठिकाणीच या मुलाला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर ८ , शांती निकेतन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . या कुटुंबातील कुटुंब प्रमुख वडाळा ट्रक टर्मीनन्स येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोहिड -१२ पॉझिटिक आलेले आहे . त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . नविन पनवेल , सेक्टर -१३ . ए . टाईप येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोहिड़ -१ ९ पॉझिटिक आलली आहे . सदर ठिकाणावर याआधी अनेक व्यक्ती काव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . या व्यक्त्तापासूनच सदर व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नविन पनवेल , सेक्टर -८ , कमलकूज सोसायटी येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .