ब्रेकिंग :- तळोजा एमआयडीसीत मोठी आग

 

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना
पनवेल प्रतिनिधी: – तळोजा एमआयडीसीत एका कंपनीला आग लागली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्नि शमन दलाचे बंब रवाना झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्याचे काम सुरू झाले आहे.

आग कोणत्या कंपनीला आणि कशी लागली याबाबत माहिती मिळालेली नाही. आगीचे लोळ निघत असल्याचे प्रथमदर्शनी व्यक्तींनी सांगितले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धूर हवेत पसरला आहे. लॉक डाऊनच्या काळात अशाप्रकारे आगीची ही पहिलीच घटना घडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. परंतु जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. यामुळे पूर्णपणे तळोजा एमआयडीसी हादरून गेले आहे. तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.