पनवेल ग्रामीणमध्ये नव्याने सहा रुग्णांची नोंद

 


11 जणांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल ग्रामीण भागातील चोवीस तासात नव्याने सहा रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे 11 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जे नव्याने रुग्ण सापडले आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी तसेच कुटुंबातील सदस्यांकडून संसर्ग झाला आहे. दरम्यान दिवसेंदिवस आकडा जरी वाढत असला तरी कोविड मुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

चिखले येथील ५२ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . या व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . विचुंबे आकांक्षा बिल्डींग , सी विंग , येथील ३३ वर्षीय व्यक्ती पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . कसळखंड येथील ३० वर्षीय , व्यक्तीला कोविड झाला आहे . सदर व्यक्तीच्या कामाच्य ठिकाणी एक सहकारी हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर व्यक्तीस त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . पालीदेवद – सुकापूर येथील २ ९ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती तुर्भे येथे फार्मासिटीकल कंपनीमध्ये नोकरीस आहे . व्यक्तीस त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . मारीगोल्ड सिटी , येथील ३० वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . ही व्यक्ती सायन हॉस्पिटल मुंबई येथे नोकरीस आहे . पालीदेवद – सुकापूर , येथील ५२ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बेस्ट , मुंबई येथे नोकरीस आहे . सदर व्यक्तीस त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

अकरा जणांना रुग्णालयातून घरी सोडले
पनवेल ग्रामीण मधील एकूण अकरा जणांना आपल्या घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 64 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.