भय इथले संपत नाही: कळंबोलीतील एका महिलेचा कोरोन मुळे मृत्यू

 


दीपक फर्टीलायझर, एनएमएमटी व शेडुंग टोल नाक्यावर ही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव
पनवेल मनपा हद्दीत २४ तासात १४रुग्णांची नोंद
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना या महामारी रोगाचे भय काही केल्या संपताना दिसत नाही. शुक्रवारी कळंबोली वसाहतीतील एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे मृतांची संख्या ही १५वर पोचली आहे. पनवेल मनपा हद्दीत २४ तासात नव्याने १४रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तळोजा औद्योगिक वसाहतीतील दिपक फर्टीलायझर मध्ये तसेच एनएमएमटी कर्मचारी आणि शेडुंग टोल नाक्यावर एका नवी मुंबई पोलिसाचे कोविड१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कोरोना विषाणूंचे संक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे.

कळंबोली १५ , ब्लंक स्मीथ कॉर्नर -२ येथील ४७ वर्षीय १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली होती . या महिलेला याअगोदरच टायफाईडचा त्रास होता. शुक्रवारी या रुग्णाचे दुःखद निधन झाले. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आराखड्यामुळे एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी खारघर , सेक्टर -१२ , प्लॉट नं .७७ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . सदर व्यक्ती रे – रोड , मुंबई येथे हार्डवेअरचा व्यवसाय करत आहे . कामाच्या ठिकाणीच या दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नवीन पनवेल , सेक्टर -५३ , ए – टाईप येथील ३८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती एनएमएमटी मध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच चा व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नवीन पनवेल , सेक्टर -१४ , अमृतवेल अपार्टमेंट येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला सायन हॉस्पीटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक कि निष्कर्ष आहे . नवीन पनवेल सेक्टर सेक्टर -१ / एस, सिटी अॅवेन्यू बिल्डिंग येथील ८१ वर्षीय १ महिला कोकिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही महिला सायन कोळीवाडा येथे राहत असून दिनांक १५ मे रोजी पनवेल येथील आपल्या मुलीकड़े राहण्यास आलेली आहे . सायन कोळीवाडा येथेच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , संक्टर -२० , साई आशिष अपार्टमेंट येथील ३ ९ वर्षीय १ महिला काव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर महिला नेरुळ येथील एका हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे , कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . .पनवेल , कामोठे , सक्दा नविन पनवेल , सेक्टर -4 ए . हरिमहल सोसायटी येथील ५५ वर्षीय व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती दिपक फर्टीलायझर , तळोजा येथे कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . सेक्टर -२१ , शुभ आर्केड बिल्डिंग येथील ३६ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . हया महिलेची एक नातेवाईक याआधीच कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . तिच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -१ , ध्यान सोसायटी येथील ४१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती नवी मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून शेडुंग टोलनाका येथे काम करीत होती . कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याच प्राथमिक निष्कर्ष आहे . रोडपाली , सेक्टर -२० , सनसिटी रेवा सोसायटी येथील ३० वर्षीय र व्यक्ती काव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती मिलियन बिजनेस पार्क , म्हापे , नवी मुंबई येथे मेडिकल स्पलायर्स म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -३५ , साईपूजा आर्कड़ येथील ३८ वर्षीय १ व्यक्ती कोकिङ -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती एचडीएफसी बँक , चेंबुर येथे कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामाठे , सेक्टर -७ , जय गणराज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती काविड -५ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . काही दिवसापुर्वी यांच्या शेजारील एक महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलली होती . तिच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -११ , महादेव पाटील सोसायटी येथील २६ वर्षीय १ व्यक्ती कोविड़ -१ ९ पॉझिटिव्ह आलली आहे . या सोसायटीमधील एकूण चार व्यक्ती याआधी कोव्हिड -१ ९ पॉझिटिक आलेल्या होत्या . त्यांच्यापासूनच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे .

पंधरा जणांना घरी सोडले
कामोठे वसाहतीतील ७, कळंबोलीतील ३, खारघर येथील २, नवीन पनवेल मधील दोन पनवेल शहरातील एक असे पंधरा जण कोरोना मुक्त झाले आहेत.