चिंताजनक : पनवेल मनपा हद्दीत मृतांचा आकडा वाढतोय

 


कळंबोलीत आणखी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू
२४ तासात आढळले १९ नवे रुग्ण
एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही दररोज एक आणि दोनने पुढे सरकत आहे. शनिवारी कळंबोली येथील आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १६ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात मनपा हद्दीत नव्या १९ रुग्णांची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील दोन एक पोलीस अधिकारी पोलिसांना लागण झाली आहे. याशिवाय बँक, इतर रुग्ण , रुग्णालयात काम करणारे आणि बँकर्स सुद्धा यामध्ये आहेत.

कळंबोली सेक्टर -३ ई , बिल्डिंग क्रमांक १५ येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली होती . सदर व्यक्ती गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती . या रुग्णाचे शुक्रवारी रात्री दुःखद निधन झाले आहे . सदर व्यक्ती बाबतची माहिती महानगरपालिकला आजरोजी प्राप्त झाली आहे. दरम्यान एका तरुणाचा या महामारी रोगात बळी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आहे.
खारघर , सेक्टर -१५ , प्रियदर्शनी सोसायटी येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती वडाळा पोलिस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . नवीन पनवेल , सेक्टर -१२ , सन स्टोन अपार्टमेंट येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती हिंदुजा हॉस्पीटल , मुंबई येथे सिटीस्कॅन टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली , सेक्टर -१७ . व्हिक्टोरिया पार्क येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . हया व्यक्ती पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्यापैकी एक पोलिस कर्मचारी एपीएमसी मार्केट , वाशी येथे काम करीत होता . कामाच्या ठिकाणीच त्यांना व त्यांच्यापासून दुसऱ्याला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -५ , कावेरी सोसायटी येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मलनिस्सारण विभागामध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खांदा कॉलनी , सेक्टर -१० , कन्हैया अपार्टमेंट येथील ४७ वर्षीय महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . हया महिलेला टी.बी. व लिवरचा त्रास असून ती उपचारासाठी वारंवार सानपाडा येथील एका हॉस्पीटलमध्ये जात होती . सदर हॉस्पीटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे . . कामोठे , सेक्टर -१६ , श्री कृष्ण पॅलेस येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड़ -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर -१६ , कृष्णाई निवास येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती काव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती सायन बेस्टइंपो येथे बेस्ट ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . खारघर , सेक्टर -१४ . रघुनाथ विहार सोसायटी येथील ६२ वर्षीय १ महिला कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही महिला गळयाच्या गाठीवर उपचार घेण्याकरीता वारंवार हॉस्पीटलमध्ये जात होतो . सदर हॉस्पीटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कळंबोली . सेक्टर -३ . के.एन .५ / १ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोकिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . यापैकी एक व्यक्ती लॉजेस्टोक कंपनी , आष्टे येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीना व त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -२१ . साई प्राईड सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती काव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . यापैकी एक व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला व त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -३५ , अनिरूध्द आर्केड सोसायटी येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती मरोळ , मुंबई येथे पोलिस विभागात ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -८ . शुभम कॉम्प्लेक्स येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव आलेली आहे . ही व्यक्ती कुला नागरी सहकारी बँक , शाखा विद्यविहार येथे लिपिक म्हणून कार्यरत आहे . कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . कामोठे , सेक्टर -१२ . पुष्प संगम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .

चौदा रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पनवेल महानगरपालिका हद्दीतील एकूण 14 रुग्णांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. या सर्वांना कोविड मुक्त जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कामोठे वसाहतीतील ७, खारघर येथील ४, कळंबोली आणि नवीन पनवेल मधील प्रत्येकी दोन जणांचा समावेश आहे.