दुःखद बातमी: पनवेल ग्रामीणमध्ये कोरोना ने दोघांचा बळी

 


२४ तासात नव्याने आठ रुग्णांची नोंद
१० जणांना रुग्णालयातून घरी सोडले
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल ग्रामीणमध्ये दोन जणांचा कोविड मुळे मृत्यू झाला. दोनही रुग्ण ६० वर्षावरील होते. त्यांच्यावर एमजीएम कामोठे येथे उपचार सुरु होते. मात्र कोरोना या महामारी रोगाने त्यांचा बळी घेतला. त्यामुळे ग्रामीण मधील मृतांची संख्या पाच वर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात नव्याने आठ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी काहींना कामाच्या ठिकाणी तर काही आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींकडून कोरोना बाधित झाले आहेत. ३रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान दहा जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

उमरोलीग्रीन रिव्हरसाईट , येथील ६४ वर्षीय व्यक्ती एम.जी.एम. रूग्णालय , कामोठे येथे मयत झालेली आहे .पालीदेवद – सुकापूर निम्बेशवर कुंज सोसायटीतील ६८ वर्षीय व्यक्ती कोरोना आजारावर एम.जी.एम. रूग्णालय उपचार घेत असताना मृत्यू पावली. त्यामुळे पनवेल ग्रामीणमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच मृतांचा आकडा ही हळूहळू सरकत चालला आहे.

पालीदेवद – सुकापूर , वरदविनायक सोसायटी येथील ३३ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बी.पी.सी.एल. , मंबई येथे नोकरीस आहे . त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . चिपळे येथील ३ ९ वर्षीय , ३५ वर्षीय असे दोन व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदरहू दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती बॉम्बे हॉस्पिटल , मंबई येथे प्रसुतीकरिता अॅडमिट होती . सदरच्या ठिकाणी दोनही व्यक्तीस संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . आष्टे
येथील २७ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कामाच्य ठिकाणी एक सहकारी हे याआधी कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेले होते . सदर व्यक्तीस त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे . करंजाडे , टुडे अव्हेन्यु , प्लॉट २३ , सेक्टर १ , येथील २२ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . चिपळे येथील ३० वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . करंजाडे शिव अपार्टमेंट , येथील ३७ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे . विचुंबे पांडूरंग निवास , येथील ४८ वर्षीय , व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटीव्ह आलेली आहे . सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे .