माजी नगरसेविका अर्चना ब्रीद यांचे निधन

 


पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका अर्चना विजय ब्रीद यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या 62 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पाठीमागे पती दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. ब्रीद यांच्या निधनाबद्दल माजी नगराध्यक्ष सुनील घरत, सुनील मोहोड आणि संदीप पाटील, नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी शोक व्यक्त केला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 13 टाईप मध्ये राहणारे ब्रीद कुटुंबीय हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रभागी होते. माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली अर्चना ब्रिद यांनी 2001 ते 2006 या कालावधीत नगरसेविका म्हणून काम केले. उत्तम जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव होता. सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि माणुसकी जपणाऱ्या अर्चना ताईंनी अचानक या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने नवीन पनवेल येथील ए टाइप परिसरावर शोककळा पसरली आहे.