लोकनेतृत्वाची सहचारिणी


एखाद्या यशस्वी पुरुषापाठीमागे स्त्रीचा हात असतो. हे आपण कायम ऐकत आलोय. अनेकदा वाचनातही ही गोष्ट येते , पण प्रत्यक्षात साक्षीदार होण्याचा योग सर्वांना येतो असे नाही. हो ही गोष्ट केवळ बोलणे, ऐकणे वाचण्यापूर्वी मर्यादित नाही. पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांचे योगदान मोलाचे आहे. निलेशजी यांचा राजकीय प्रवास अतिशय खडतर होता. अनेक अडथळ्यांच्या शर्यती त्यांना पार कराव्या लागल्या. समाजाचे काम करीत असतानाही कित्येकदा काटेरी वाटेवरून लंके यांना चालावे लागले. खूप वेळा त्यांचे पाय रक्ताळे सुद्धा, मात्र त्यांनी आपली वाट कधीच सोडली नाही. कारण त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी भरभक्कम आधार दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही निलेशजींना सामाजिक राजकीय जीवनात कधीच कौटुंबिक अडथळा आला नाही. किंवा त्यांची वाट सुद्धा अडवले गेले नाही. उलट सामाजिक व राजकीय क्षितिजाकडे जाण्यासाठी एक लहानशी पाऊलवाट तयार करण्यात त्यांनी मदत केली. सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता, आणि कमालीची माणुसकी असलेल्या आमदार निलेश लंके यांना जनतेने डोक्यावर घेतले. परंतु या यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना कमालीचे परिश्रम घ्यावे लागले. संकट अडीअडचणींना सामोरे जावे लागले. मात्र हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तसेच इच्छित स्थळ गाठण्यासाठी त्यांना आई वडील भाऊ यांच्याप्रमाणेच पत्नी राणीताई लंके यांनी भरभक्कम साथ दिली. हे कदापिही विसरून चालणार नाही. आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत वहिनींनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपली. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर स्वतःलाही समाजकार्यात झोकून दिले. पतीचे समाजकारण अधिक भक्कम आणि मजबूत करण्याचे काम वहिनींनी केले. आज आमदार महोदय यांच्यासमवेत इतका मोठा दांडगा समुदाय आहे. हीच लंके कुटुंबीयांनी कमावलेली संपत्ती आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पारनेर नगर मतदारसंघातील माता-भगिनींना संघटित करण्यात राणीताईंचे योगदान मोलाचे आहे. लग्नसराईत हे दांपत्य दररोज शंभर लग्नांना हजेरी लावत. त्यामध्ये अर्ध्याहून अधिक लग्नसमारंभात जाऊन वधू आणि वरांना वहिनी शुभेच्छा देतात. निलेशजी कामानिमित्त बाहेर असलेले की ही सर्व जबाबदारी राणीताईंच्या खांद्यावर असते. एकाही लग्न त्याही चुकवत नाहीत. सुखाबरोबरच दुःखातही त्या सहभागी होतात.
लग्न झाल्यानंतर आपल्या पती कडूनच अप्रत्यक्षरीत्या त्यांना समाजकारणाचे धडे मिळाले. त्यांनी त्यातच सुख आणि आनंद मानत समाजसेवेचे व्रत अंगिकारले ,परिणामी आमदार निलेश लंके यांच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने राजकीय मक्तेदारी मोडीत काढत इतिहास घडवला. त्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सर्वसामान्य जनतेने राजकारणाच्या एकाधिकारशाही विरोधात जो लढा पुकारला होता. त्यामध्ये राणीवहिनींनी खऱ्या अर्थाने रणरागिनी ची भूमिका पार पाडली. विधानसभा निवडणुकीत त्या संपूर्ण मतदारसंघात फिरल्या प्रभावी आणि सक्षम पणे प्रचार केला. ऊन वारा पावसाची तमा बाळगली नाही. मोठ्या गावांमध्ये प्रचार फेऱ्या काढल्या, गावोगावी जाऊन मतदार बंधू-भगिनींना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर गेल्या दोन दशकात नेत्यांनी या भागांमध्ये केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवली. या सावित्रीच्या लेकी ने सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या रूपाने जनतेचा आमदार निवडून आणण्याकरता संकल्प केला आणि तो सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली. राणीताई निलेश लंके या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. सुपा गटातून त्यांनी विजय संपादन केला. अहमदनगर जिल्हा परिषदेत या भागाचे नेतृत्व करत असताना त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावले. त्या अगोदर पारनेर पंचायत समितीचे उपसभापती पद सुद्धा भूषवले. शासकीय कामाचा त्यांच्याकडे जवळपास दशकभराचा अनुभव आहे. निलेशजींना त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या ही हिरकणी आपल्या दोन मुलांची जबाबदारी सांभाळत आहेत. या सर्वसामान्य कुटुंबातील लेक व सुनेने अहमदनगर या मातब्बरांच्या जिल्ह्यात सर्वसामान्यांची सक्षम महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. परंतु हे सर्व काही असताना नेत्यांप्रमाणे त्यांचीही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अधोरेखित होते. आज लोकं नेतृत्वाच्या या सहचारिणी चा जन्मदिवस त्यानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!

नाना करंजुले