सामाजिक कार्यकर्ते सुरेश उबाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

आमदार निलेश लंके यांच्यासह मान्यवरांनी केले  अभिष्टचिंतन
ताराचंद करंजुले, आप्पासाहेब फडके व नितीन साठे यांचाही वाढदिवस साजरा
पारनेर /प्रतिनिधी:- पाडळी रांजणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि निलेश लंके प्रतिष्ठान चे सदस्य सुरेश सुखदेव उबाळे यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उबाळे यांच्यावर अक्षरशा शुभेच्छांचा वर्षाव झाला. आमदार निलेश लंके यांच्यासह इतर मान्यवरांनी सायंकाळी पाडळी रांजणगाव येथील येऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. याशिवाय गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद करंजुले, आप्पासाहेब फडके व नितीन साठे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनाही जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सुरेश उबाळे हे गेल्या काही वर्षांपासून पाडळी रांजणगाव मध्ये सामाजिक, अध्यात्मिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रभागी असतात. उबाळे हे श्री प्रभू हनुमानाचे निस्सीम भक्त आहेत. हनुमान जयंतीनिमित्त गेले अनेक वर्ष पुणतांबा ते पाडळी रांजणगाव या कावड यात्रेचे ते नेतृत्व करीत आहेत. सत्याची चाड असलेले उबाळे सामाजिक क्षेत्रातही अग्रभागी असतात. गरीब गरजूंना मदतीचा हात ते सातत्याने देत आले आहेत. गावातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असतात. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सुरेश उबाळे यांची संवेदनशील, प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून पाडळी रांजणगाव पंचक्रोशीत ओळख आहे. त्यांच्या पत्नी सीमा उबाळे या पाडळी रांजणगाव च्या विद्यमान सरपंच आहेत. उबाळे यांच्या पाठीमागे तरुणांची मोठी ताकद आहे. आबालवृद्धांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पाडळी रांजणगाव मध्ये विविध विकास कामांकरिता ते प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सकाळी जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके यांनी हजेरी लावून विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. सायंकाळी आमदार निलेश लंके यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठान चे महाराष्ट्र अध्यक्ष सुदाम पवार,  ज्येष्ठ सल्लागार राजू शेठ चौधरी, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापू शिर्के, सचिव कारभारी पोटघन यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित राहून सुरेश उबाळे यांना जन्मदिवसाच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार निलेश लंके यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्याचबरोबर इतर कार्यकर्त्यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ सल्लागार राजू शेठ चौधरी यांचाही गुरुवारी वाढदिवस असल्याने पाडळी रांजणगाव च्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले