टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या सोळाशे जणांना कायद्याचा हिसका


नवी मुंबई पोलिसांची परिमंडळ२ मध्ये धडक कारवाई
यापुढेही नाकाबंदी सुरूच राहणार
पनवेल प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका क्षेत्र, ग्रामीण भाग आणि उरण परिसरात नवीन मुंबई पोलिसांनी नाका-बंदी सुरू केले आहे. सोमवारी परिमंडळ 2 मध्ये टाळेबंदी तोडणाऱ्या १५९६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यापुढे पोलिसांकडून लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या आदेशानुसार सोमवारी भादवि १८८ प्रमाणे एकुण ५३७ कारवाया व मोटार वाहन व इतर कायद्यान्वये ९ १६ केसेस करण्यात आलेल्या आहेत .
१ ) मोटार वाहन कायदा , महाराष्ट्र पोलीस कायदा व इतर कायद्यान्वये ९ १६ केसेस , २ ) अनावश्यक बाहेर फिरणा – या व्यक्तींची २१० वाहने जप्त . ३ ) मास्क न लावणे व सामाजिक अंतर न पाळलेबाबत ६५ लोकांवर कारवाई , ४ ) अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या ३४३ लोकांवर कारवाई ५ ) मॉर्निग इव्हिनिंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ४० लोकांवर कारवाई ६ ) सामजिक अंतर न पाळलेबाबत १० लोकांवर कारवाई ७ ) सामजिक अंतर व इतर आरोग्यविषयक खबरदारी न घेता आस्थापना चालु असल्यास ०७ कारवाई ८ ) लॉकडाऊन काळात ठरवून दिलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक केल्याबाबत २४ कारवाया ९ ) इतर भादवि कलम १८८ अन्वये ४८ केसेस करण्यात आल्या.