उरण तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन

 

 

13 ते 16 जुलै यादरम्यान अंमलबजावणी होणार
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करता प्रशासनाचे पाऊल
प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्याकडून आदेश निर्गमित
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिका क्षेत्राप्रमाणे संपूर्ण उरण तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे. सोमवारी सकाळी पाच वाजल्यापासून ते 16 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत हा टाळे बंद राहणार आहे. गुरुवारी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी हे आदेश निर्गमित केले. याबाबत कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे नवले यांच्याकडून सांगण्यात आले.

पनवेलच्या बाजूला लागून असलेल्या उरण तालुक्यातही कोरोना संक्रमण वाढले आहे. याठिकाणी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजच्या घडीला 420 जितका आकडा आहे. त्यापैकी 254 बरे झाले आहेत. तर 157 रुग्ण उपचार घेत आहेत. नऊ जणांचा यामध्ये रोगाने बळी घेतला. दरम्यान पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि कोरोनाविषाणू बाधित ग्रामीण भागामध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे. त्या धर्तीवर संपूर्ण उरण तालुक्यात चार दिवसांचा टाळेबंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची पूर्वपरवानगी यासाठी घेण्यात आलेली आहे.
सुरुवातीला 13 ते 16 जुलैपर्यंत असलेला हा लॉक डाऊचा कालावधी आवश्यकतेनुसार वाढविण्यात येईल असे प्रांताधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. तसेच संपूर्ण उरण तालुक्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे लाकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे .

या गोष्टींची अंमलबजावणी केली जाईल .

१ ) अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने – आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता उरण तालुक्याच्या हददीत लाकडाऊन लागू असेल
२ ) या कालावधीत सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना उरण तालुक्यामध्ये परवानगी दिली जाणार नाही . टॅक्सी , ऑटोरिक्षा , यांनाही प्रवाशी वाहतुकीची परवानगी असणार नाही . तथापि , आपत्कालिन वैद्यकिय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल . या आदेशांतर्गत ड्रायव्हर शिवाय केवळ एका प्रवाशासह खाजगी वाहनांना , परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू , आरोग्य सेवा आणि या आदेशांतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल ,
३ ) सर्व आंतराराज्यीय बस आणि प्रवासी वाहतुक सेवांचे . ( खाजगी वाहनांसह ) , तसेच खाजगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद असेल तथापि बाहेरुन येऊन , बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल .
४ ) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे . त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे . नाहीतर तो ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि तिला किंवा त्याला शासनाच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरीत केले जाईल .
५ ) सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन , वरील परिच्छेद -२ मध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करुन . केवळ परवानगी असलेल्या कामासाठीच बाहेर येतील
. ६ ) सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.
७ ) व्यावसायिक आस्थापना , कार्यालये आणि कार्यशाळा इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील . तथापी , सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटसना परवानगी असेल , तसेच डाळ व तांदुळ गिरणी , खाद्य व संबंधित उद्योग , दुग्धशाळा , खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेली मॅन्युफैक्चरिंग युनिटस चालविण्यास परवानगी असेल
८ ) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह चालू ठेवण्याची परवानगी असेल आणि ते चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून ३ फुट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी पावले उचलतील . ते त्यांच्या आवारात योग्य स्वच्छता आणि ( हात ) संनिटायझर्स / हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करतील , ९ ) आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने / आस्थापनांना वरील प्रतिबंधामधून वगळण्यात येत आहे . a ) बँका / एटीएम / विमा आणि संबंधित बाबी . b ) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे , c ) आय.टी. आणि आयटीईएस . टेलिकॉम , टपाल . इंटरनेट आणि डेटा सेवांसह . d ) पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व उपलब्धता . e ) कृषी वस्तु आणि उत्पादने आणि सर्व वस्तूंची निर्यात आणि आयात . ) अन्न , फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तुंचे ई कॉमर्स ( वितरण )

g ) पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैदयकीय आस्थापने , h ) रुग्णालये , फार्मासि आणि ऑप्टिकलस्टोअर्स , फार्मास्युटिकल्स मॅन्युफैक्चरिंग आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक 1 ) पेट्रोलपंप , एलपीजी , गॅस , तेल एजन्सी , त्यांची गोदामे आणि त्यांची संबंधित वाहतूक कार्य केवळ अत्यावश्यक सेवतील पास धारकांसाठी j ) सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा ( ज्यात खाजगी एजन्सीद्वारे ) आवश्यक सेवा पुरविणाऱ्या संस्थांना पुरविल्या जातात . k ) खाजगी आस्थापना , ज्या आवश्यक सेवांच्या सहाय्यकारी सेवा किंवा कोविड -१ ९ च्या नियंत्रणासाठी सहाय्य करणाऱ्या सेवा . ” वरील संबंधित पुरवठा साखळी . m ) मद्यविक्री दुकाने केवळ होम डिलीव्हरी अनुज्ञेय आहे . n ) जे इंडस्ट्रीयल युनिट सद्यस्थितीत सुरु आहेत ते तसेच सुरु राहतील . १० ) राज्य सरकारचे विभाग / कार्यालये आणि सेवा प्रदान करणारे , सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ( पीएसयू ) केवळ अत्यावश्यक सेवा प्रदान करण्याच्या मर्यादेपर्यंत कार्य करतील
११ ) कोविड -१ ९ रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैकल्पिक शस्त्रक्रिया नियोजित करण्यात याव्यात .
१२ ) संबंधित संस्था संघटना व आस्थापनांच्या संदर्भात मा.पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त अधिकारी , महसूल अधिकारी , ग्रामविकास अधिकारी आणि इतर सक्षम प्राधिकारी उपरोक्त नियम आणि अंमलबजावणीसाठी अधिकृत , माणूसकीच्या व न्याय मार्गाने सर्व आवश्यक उपाययोजना करतील .
१३ ) या नियमांच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर महामारी रोग अधिनियम १८ ९ ७ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अंतर्गत इतर संबंधित कायदे व नियमांच्या तरतूदीनूसार कारवाई केली जाईल . १४ ) या नियमानुसार कोणत्याही गोष्टी केल्यास किंवा चांगल्या हेतूने कोणत्याही गोष्टी केल्यास , त्या व्यक्तीविरुध्द खटला किंवा कायदेशीर कारवाई होणार नाही . १५ ) पुढील प्रकारच्या लोकांना पोलीस यांनी त्यांचे ओळखपत्र तपासून लॉकडाऊन क्षेत्राच्या बाहेर सोडावे . आ शासकीय ओळखपत्र धारक कर्मचारी , २. जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत . महानगर पालिका इत्यादी कर्मचारी , ३ . बैंक कर्मचारी , ४. टेलिफोन कर्मचारी , ५. हॉस्पीटल कर्मचारी , ६. पत्रकार , ७. जेएनपीटी कर्मचारी . १६ ) किराणा व भाजीपाला यांची घरपोहोच ( होम डिलिव्हरी ) सेवा सकाळी ९ .०० वा . ते रात्री ७.०० वाजेपर्यंत चालू ठेवता येईल